Ad will apear here
Next
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा रथ रवाना

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या प्रस्तावित महाजनादेश यात्रेचा सुसज्ज रथ मंगळवारी (३० जुलै) मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयातून प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केला.

या वेळी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, प्रदेश सचिव संजय उपाध्याय, प्रदेश माध्यम विभागप्रमुख व प्रवक्ते केशव उपाध्ये, तसेच प्रवक्ते अवधूत वाघ उपस्थित होते.

या वेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘भाजप राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यापूर्वी यात्रांसाठी वापरलेल्या रथांचा वापर मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी करण्यात येत आहे. शिवराजसिंह चौहान यांनी सात वर्षे मध्य प्रदेशात जनसंपर्कासाठी हा रथ वापरला होता. त्याची दुरुस्ती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेसाठी वापरण्यात येणार आहे.’

महाजनादेश यात्रेसाठीचे रथ पक्षाचा विचार जनतेमध्ये पोहचवतील आणि आगामी विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणतील, असा विश्वास असल्याचे नाईक यांनी नमूद केले.


महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कर्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून एक ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून सुरू होणाऱ्या या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्टला नाशिक येथे होणार आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथून एक ते नऊ ऑगस्टदरम्यान पहिला टप्पा होणार असून, या भागातील एकूण १४ जिल्ह्यांत ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ५७ विधानसभा मतदारसंघातून एक हजार ६३९ किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार आहे. 

यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टला सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यांत ही यात्रा १८ जिल्ह्यांतील ९३ विधानसभा मतदारसंघात दोन हजार ७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून चार हजार ३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे. दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ८७ मोठ्या सभा, ५७ स्वागत सभा होणार आहेत. या शिवाय एकूण २३८ पेक्षा अधिक गावांमध्ये स्वागत स्वीकारून यात्रा नाशिक येथे पोहोचेल. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZFICC
Similar Posts
देवेंद्र फडणवीस यांची एक ऑगस्टपासून महाजनादेश यात्रा मुंबई : राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कर्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून एक ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे
‘संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर द्यावा’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येणार्‍या काळात संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर दिला पाहिजे,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत केले.
चंद्रकांत पाटील यांनी मानले सर्व यंत्रणांचे आभार मुंबई : पुराचे पाणी रुळांवर आल्याने मुंबई ते कोल्हापूर जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी बदलापूर-वांगणी दरम्यान अडकली होती त्यात तब्बल बाराशे प्रवासी प्रवास करत होते; मात्र महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांनी वेळीच युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
राज्यपालपदाच्या कार्यकाळानंतर राम नाईक यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश मुंबई : उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदाचा कार्यकाळ २९ जुलैला संपल्यानंतर ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी आज (३० जुलै २०१९) मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राम नाईक यांचे भाजपमध्ये स्वागत केले. त्यांच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language